No products in the cart.
व्ही. नागदास यांची नेमणूक
नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी चित्रकार व्ही. नागदास यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज १३ मार्च २०२३ रोजी नागदास यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. ललित कला अकादमीचा सचिव रामकृष्ण वेदाला यांनी नागदास यांचे स्वागत केले.
व्ही. नागदास हे इंदिरा संगीत कला विश्वविद्यालय खैरागढ, छत्तीसगढ येथे प्रिन्टमेकिंग विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मागील वर्षी ते या पदावरून निवृत्त झाले. ३७ वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य केले. त्यांनी बहुतांश काम हे प्रिन्टमेकिंग या विषयात केले आहे.
ललित कला अकादमीने नागदास यांची अध्यक्षपदी नेमणूक केली असली तरी संस्थेच्या वेबसाईटवर अजूनही उमा नांदुरी यांचा अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे. खरं तर नांदुरी या संस्थेच्या सचिव आहेत. पण मागील काही वर्षात संस्थेचे शासकीय कर्मचारीच संस्थेवर आपले प्रभुत्व गाजवतात अशी कला वर्तुळात कुजबुज आहे. नागदास यांच्या नेमणुकीने ही परिस्थिती बदलेल आणि सकारात्मक बदल घडतील या अपेक्षेत कला वर्तुळ आहे. नागदास यांच्या कारकिर्दीत तरी महाराष्ट्रात ललित कला अकादमीच्या केंद्राची स्थापन होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि आणि नागदास यांना शुभेच्छा देऊया.
*****
फोटो सौजन्य : इंटरनेट
Related
Please login to join discussion