No products in the cart.
विजय सुर्वे यांचे निधन
शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय औरंगाबाद चे माजी विद्यार्थी आणि प्रतिथयश यु आय/ यु एक्स डिझाइनर विजय सुर्वे (वय ३४) यांचे दि ३० सप्टेंबर रोजी अकस्मात निधन झाले. शासकीय महाविद्यायाचे ते २००६-१० बॅचचे विद्यार्थी होते. अनेक नामांकित कंपन्यात त्यांनी यु आय/ यु एक्स डिझाइनर म्हणून काम केले असून ते सिटी बँक पुणे येथे मॅनेजर पदावर कार्यरत होते. शासकीय कला महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी यु आय/ यु एक्स क्षेत्रासंबंधी मार्गदर्शन केले होते. या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती. काही वर्ष त्यांनी डेकोस या युरोपियन कंपनीसाठी यु आय/ यु एक्स डिझाइनर म्हणून काम केले होते. पुणे येथे क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट हे डिझाईनिंगची ट्रेनिंग देणारे प्रसिद्ध इन्स्टिट्यूटही ते चालवत होते.
खरं तर त्यांचं यशस्वी करिअर इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक होतं. चिन्हच्या यूट्यूब चॅनेलसाठी आम्ही त्यांची मुलाखत घेणार होतो. पण हे सर्व आता शक्य होणार नाही. विजय सुर्वे सामान्य कुटुंबातून आले होते. अथक परिश्रमाच्या जोरावर ते सिटी बँकेच्या मॅनेजर पदापर्यंत पोचले होते. शासकीय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही ही त्यांची खंत होती म्हणून ते विद्यार्थ्यांना वेळोवेळी संपर्क साधून मार्गदर्शन करता असत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे औरंगाबाद कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना यु आय यु एक्स क्षेत्रात करिअरची सुरुवात करता आली.
विजय सुर्वे यांना चिन्ह आर्ट न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
****
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion