No products in the cart.
विक्रांत शितोळे यांना BBC wild life magazine पुरस्कार
पनवेल येथील प्रसिद्ध चित्रकार श्री. विक्रांत शितोळे यांच्या ‘द अनलिश्ड ‘ या चित्राला अत्यंत प्रतिष्ठित असा Wildlife Artist of the Year 2022 in association with BBC Wildlife Magzine या संस्थेचा Elizabeth Hosking Prize for Watercolour हा ५००£ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ५६ देशांतून आलेल्या ९०० चित्रकारांच्या १६५० चित्रांमधून निवडल्या गेलेल्या विजेत्या चित्रकारांपैकी श्री. विक्रांत शितोळे एक आहेत.
शितोळे यांनी रेखाटलेल्या बिबट्याच्या या अभ्यासपूर्ण चित्राचे परीक्षक, एलिझाबेथ हॉस्किंग आणि हेझेल सोन यांनी “ही एक अत्यंत आत्मविश्वासपूर्ण कलाकृती असून, ज्याला जलरंगाचे सौंदर्य कसे वाढवावे हे माहित असलेल्या एखाद्या व्यक्तीने साकारले आहे.” अशी प्रशंसा केली.
DSWF हि संस्था वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात भविष्य सुरक्षित करण्यास मदत करणाऱ्या आघाडीच्या संवर्धन प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निधी उभारन्याचे कार्य करते. याच उपक्रमाअंतर्गत Wildlife Artist of the Year 2022 हि स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात होणाऱ्या चित्रविक्रीची ५०% रक्कम हि या DSWF च्या वन्यजीव संरक्षक कार्याकरिता वापरली जाते. श्री. विक्रांत शितोळे यांच्या या चित्राची पुरस्कार जाहीर होण्याअगोदरच विक्री झालेली असून येणाऱ्या रकमेतील ५०% भाग हा DSWF च्या महत्वपूर्ण अशा वन्यजीव संरक्षक कार्याकरिता वापरला जाणार आहे. निवडक व विजेत्या कलाकृतींचे प्रदर्शन https://davidshepherd.org/ या संकेतस्थळावर २ ऑक्टोबर पर्यंत पहायला मिळेल.
तसेच सर्व विजेत्यांची काही चित्रे वर्षभर प्रदर्शित करण्यात येतील.
Related
Please login to join discussion