No products in the cart.
‘व्यक्ती-चित्र-पट’ प्रदर्शन
महाराष्ट्र कल्चरल सेंटर तर्फे ‘व्यक्ती-चित्र-पट’ या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन १८ ते २८ सप्टेंबर दरम्यान पुण्याच्या सुदर्शन कला दालन येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या हस्ते १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होईल. या प्रदर्शनात हळदणकर यांचे समकालीन एन. आर. सरदेसाई, हळदणकरांचे शिष्य वा. गो. कुलकर्णी, व्ही. आर. आंबेरकर त्यानंतरच्या पिढीचे गोपाळ देऊस्कर, एस एम पंडित, शंकर पळशीकर , जी. एस. हळदणकर, ग.ना. जाधव, दीनानाथ दलाल यासारख्या दिग्गजापासून ते सध्याच्या ख्यातकीर्त, सुहास बहुलकर, वासुदेव कामत,श्रीकांत जाधव, विजय शिंदे ,मृगांक जोशी अशा ज्येष्ठ कलावंतांसोबतच तरुण पिढीच्या रवी देव , आर.बी.होले अशा तरुण चित्रकारांची ही व्यक्तीचित्रे बघता येतील.
याखेरीज या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रकार आजोबा मुलगा व नातू अशा तीन पिढ्यांची चित्रकलेतील कामगिरी अनुभवता येईल. ही मंडळी म्हणजे जाधव आणि कांबळे कुटुंब! अगदी १९२४ पासून ची व्यक्तिचित्रणातील महाराष्ट्राची परंपरा अनुभवण्याची ही सुसंधी आहे.
प्रदर्शनाची वेळ सायंकाळी पाच ते आठ असेल. या अनोख्या प्रदर्शनाला रसिकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचा पत्ता :
सुदर्शन कला दालन.
अहिल्याबाई शाळेजवळ, शनिवार पेठ, पुणे- ३० .
Related
Please login to join discussion