No products in the cart.
कोणी शिक्षक देता का शिक्षक?
आम्ही जोतिष्यशास्त्र जाणत नाही पण दोन महिन्यानंतर जेजे स्कूल ऑफ आर्टचे पेंटिंगचे वर्ग शिक्षकाअभावी बंद पडणार आहेत हे भविष्य आम्ही सांगू शकतो.
त्याचं झालं असं उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कंत्राटी प्राध्यापकांना आता दोन महिन्यांनी सेवामुक्त करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शासनाच्या आदेशानुसार तासिका तत्वानुसार हंगामी शिक्षक नियुक्त करणे गरजेचे होते. खरं तर मागील दोन महिन्यात उपयोजित कला विभागाने अशा जाहिराती काढल्या आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती देखील केली पण पेंटिंग विभागाचे प्रमुख इतर महत्वाच्या ‘ व्यावसायिक ‘ कामात व्यस्त असावेत म्हणून त्यांनी अशी कोणतीच पदभरती अजूनही केली नाही, त्यामुळे येत्या दोन महिन्यात जेजे स्कूल ऑफ आर्टला कोणी शिक्षक देता का शिक्षक ? असे म्हणण्याची वेळ येणार आहे हे निश्चित.
या भोंगळ कारभारापायी विद्यार्थ्यांचे किती नुकसान होणार हे तो ‘विश्वनाथ’च जाणे. तेव्हा निदान आता तरी संबंधितांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन नवीन शिक्षक पदभरती करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा जर केली तर त्यात आमचे काही चुकले का ?
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion