News

चंदू कांबळेंचं असं झालं !

‘पॅलेट’च्या पहिल्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद भलताच चांगला आहे . पहिला व्हिडिओ प्रसारित होऊन पुरते वीस तास देखील उलटले नाहीत तोपर्यंत तीनशेपेक्षा अधिक लोकांनी सदर व्हिडिओ पाहिला आहे. चित्रकलेसारख्या मर्यादित क्षेत्रात मिळणारा हा प्रतिसाद खूपच मोठा आहे. अवती भवती विषय देखील खूप आहेत. त्यामुळे आठवड्यातून एक व्हिडिओ वगैरे करणं  त्रासदायक ठरेल की काय असं वाटू लागलं आहे . कारण आजच दोन तीन ताजे  विषय असे एकदम येऊन आदळले की पुढल्या बुधवारच्या प्रसारणाची वेळ येईपर्यंत ते शिळे होतील काय असं भय वाटू लागलं , म्हणूनच तातडीनं निर्णय घेतला की विषय जसे पुढे येतील तसे त्याचे व्हिडिओ बनवायचे आणि  प्रीमियर वगैरेची वाट न पाहता ते प्रसारित देखील करुन  टाकायचे .

‘पॅलेट’ मालिकेतला दुसरा व्हिडिओ आहे चंद्रकांत कांबळे यांचा . नुकतीच  त्यांची  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) सचिवपदी निवड झाली . आता तुम्ही विचाराल की हे राजकारणवाले लोक ‘ चिन्ह’ च्या कार्यक्रमात का ? तर त्याचं उत्तर असं आहे की हे चंद्रकांत कांबळे मूळचे आमच्या जेजे स्कूल ऑफ आर्टचेच  विद्यार्थी . दादरच्या छबिलदास शाळेत ते चित्रकला शिक्षक होते. सेवानिवृत्त होताना ते चक्क शाळेचे प्रिन्सिपॉल देखील झाले होते . असं म्हणतात की चित्रकला शिक्षकाला असा मान मिळवणारे ते पहिलेच . दलित पँथरच्या मुख्य नेत्यांपैकी एक असलेले आणि दलित चळवळीतले विचारवंत मानले जाणारे  प्रा अरुण कांबळे हे त्यांचे ज्येष्ठ बंधू . चंद्रकांत कांबळे हे देखील याच चळवळीतले . त्यामुळे त्यांच्याशी बातचीत महत्वाची होती .

अनेक दिवस अनेक प्रश्न साचले होते . ते कुणाला तरी विचारायचेच होते . म्हणजे कुणाला तरी विचारून त्यांची उत्तरं मिळणार नव्हती . चळवळीतलाच कुणीतरी समोर असायला हवा होता . चंद्रकांत कांबळे उर्फ चंदू कांबळे यांच्या रुपानं तो मिळाला होता  . प्रश्न अडचणीचे होते .म्हणजे उदाहरणार्थ सवलती , आरक्षण !  आरक्षणामुळे किंवा चुकीच्या लोकांच्या झालेल्या निवडीमुळे जेजे आणि कला संचालनालयाची झालेली वाताहात वगैरे .  उत्तरं काय मिळतील याविषयी मला नक्कीच उत्सुकता होती . आणि आनंदाची गोष्ट म्हणजे चंदूनं त्यांची  उत्तरं अतिशय मोकळेपणानं दिली . दुसरी बाजू देखील अतिशय प्रभावीपणे मांडली . एक दोन अडचणीचे प्रश्न अगदी सराईतपणे टोलवून आरपीआयच्या सचिवपदी झालेली आपली निवड उगाचच झालेली नाही हे देखील त्यानं दाखवून दिलं . जेजेच्या आणि कला संचालनालयाच्या लढाईत आता मी देखील सर्वांसोबत आहे हे त्यानं अगदी दिलखुलासपणे सांगून टाकलं . ज्या विषयांवर जाहीर मतं व्यक्त करायला बहुसंख्य बिचकतात त्या विषयावरचा दोन मित्रांचा हा मनमोकळा संवाद ‘चिन्ह’च्या युट्यूब चॅनलवर अवश्य पहा आणि आपली मतं मोकळेपणानं मांडा!
****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.