No products in the cart.
“गायतोंडे” का वाचायचं ?
” चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रासमोर जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा त्या चित्राच्या केवळ प्रथम दर्शनानंच कळत नकळत तुम्ही संमोहित झालेले असता. तुमची नजर त्या चित्रावरून हटत नाही. सर्वप्रथम तुम्हाला आकर्षुन घेतो तो त्या चित्राचा प्रमुख रंग. त्या रंगात खरं तर तुम्ही शब्दशः गुरफटून जाता. मंत्रमुग्ध होऊन पाहत राहता. पाहता पाहता तुम्हाला त्यात दडलेले असंख्य आकार देखील दिसू लागतात. त्या आकारांच्या गुंफण्यानं, त्यांच्या अनोख्या संयोजनानं, त्यातून निर्माण झालेल्या अनोख्या आकृतीबंधानं तुम्ही अक्षरशः थक्क होऊन गेलेले असता.
तुमची नजर त्यावरून ठरत देखील नाही अन् तुम्हाला त्या कॅनव्हास समोरून हलावंसं देखील वाटत नाही. काय पाहू न किती पाहू अशी काही तरी तुमच्या मनाची संमोहित अवस्था झालेली असते, दिसत असलेलं सारंच्या सारं तुम्हाला नजरेत साठवण्याची घाई झालेली असते. तुमच्या चित्तवृत्ती विलक्षण प्रफुल्लित झालेल्या असतात. जे दिसतंय त्या साऱ्याचं तुम्ही आता दृश्यानुभवात रूपांतर करू पहात असता. या प्रक्रियेत असतानाच तुमच्या नकळतच काही एक काळ अगदी विलक्षण शांततेच्या सुंदर क्षणांचा अनुभव तुम्हाला स्पर्श करून जाऊ लागलेला असतो. जो तुम्हाला मूक करून टाकतो, टाकतो, स्वतःच्या अगदी आत आत डोकवायला भाग पाडतो. मुग्ध करून अंतर्बाह्य गदगदा हलवून टाकतो. आतून कुठून तरी अत्यंत प्रसन्न अशा सकारात्मक ऊर्मीच्या लाटाच्या लाटा उत्पन्न करून तुम्हाला तो अंतर्बाह्य उचंबळवून टाकावयास भाग पाडतो..”
चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावरील ‘चिन्ह’नं प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या संपादकीयाची ही सुरुवात. ही वाचता वाचता गायतोंडेंच्या चित्रांमधील आकारांचा आपल्याला उलगडा होऊ लागतो. आणि आपण कधी पुस्तक वाचायला सुरुवात करतो आणि कधी ते आपल्या हातून वाचून संपत हे वाचकाला उमगत देखील नाही. कुणीतरी संमोहित केल्यासारखा त्यात तो अडकून पडतो. गायतोंडे यांच्या लोकविलक्षण जगण्यानं तो भारुन जातो. तुम्हाला देखील हा अनुभव घ्यायचा असेल तर हे पुस्तक आजच मागवा. ‘चिन्ह’च्या गाजलेल्या ‘नग्नता चित्रातली आणि मनातली’ या अंकासोबत ते चक्क भेट म्हणून मिळतंय. सर्व तपशील सोबतच्या पोस्टरमध्ये दिला आहे. थोडेच संच उरले आहेत आजच आपली मागणी नोंदवा.
( बहुचर्चित ‘नग्नता’ अंकाची किंमत रु ७५० तर कुरियर खर्च १०० रु आहे. पण ८५० रुपयात आम्ही बहुचर्चित ‘गायतोंडे’ ग्रंथाची जनआवृत्ती ( किंमत रु ५०० ) आणि ‘चित्रसूत्र’ ( किंमत रु १०० ) असे १३५० रु किंमतीचे साहित्य फक्त ८५० रुपयात देऊ केलं आहे. कृपया सवलत योजनेचा त्वरित फायदा घ्या.
Related
Please login to join discussion