No products in the cart.
खास मुलांसाठी ‘कला’ कार्यशाळा !
छत्रपती संभाजीनगर जवळच्या देवळाई इथं लहान मुलांसाठी एका कार्यशाळेच आयोजन दि 01 ते 13 मे 2023 दरम्यान करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत 07 ते 17 वर्षे वयोगटातील मुलं सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेत मुलं कशिदा काम, लिपण काम, काटूम कुटुम, चुडी काम यासारख्या हस्तकला शिकू शकतील. ‘लिपण काम’ ही कच्छ प्रांताची पारंपरिक कला आहे. काच आणि मातीच्या मिलाफातून सुंदर कलाकृती तयार करण्यात येतात.
कार्यशाळेत शिकता येणारा विशेष प्रकार म्हणजे ‘काटूम कुटुम’ ही कला. अवनींद्रनाथ टागोर यांच्या कल्पकतेतून स्फुरलेल्या या कला प्रकारात झाडांच्या वाळलेल्या काटक्यांपासून सुंदर कलाकृती तयार करण्यात येते. या कार्यशाळेत मुलांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे धडेही देण्यात येतील.
दि 14 मे 2023 रोजी कार्यशाळेत मुलांनी तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात येईल. या विविध हस्तकलांबरोबर मुलांना भ्रमंती आणि पाककलेचे धडेही देण्यात येतील. अधिक माहितीसाठी कार्यशाळेच्या आयोजक गार्गी परमार यांच्याशी 9881686981, 082371 92677 या क्रमांकावर संपर्क साधावा.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरण्याची लिंक :
https://forms.gle/zZiJzPy7mEnM9t6p6
******
Related
Please login to join discussion