No products in the cart.
डी-नोव्होच का हवंय ? | conversation within Ashutosh Apte & Satish Naik about JJ Denovo
चित्रकार अरुण कालवणकर अर्थात गुरुजी अरुणेश्वर किंवा शिव गुरुजी एका बोटीवर आहेत. ती बोट नियोजित ठिकाणी उशिरा पोहोचत असल्याने आणि ज्या बोटीवर ते आहेत त्या बोटीवरचं नेटवर्क कनेक्शन फारसं चांगलं नसल्यामुळं आजचा ‘गच्चीवरील गप्पां’चा कार्यक्रम केवळ नाईलाजास्तव रद्द करावा लागत आहे. अरुण कालवणकर यांच्याशी संपर्क होताच कार्यक्रमाची पुढील तारीख जाहीर करू, पण आता तो नक्कीच ऑगस्ट महिन्यातच होईल हे नक्की.
पण आजचा गच्चीवरचा गप्पांचा कार्यक्रम मात्र होणार आहे. आजच्या कार्यक्रमात सध्या जो विषय चर्चेत आहे त्याच विषयावर म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट अनन्य अभिमत विद्यापीठासंदर्भात जो काही घोळ मंत्री महोदयांकडून घातला जातो आहे त्यावरच प्रामुख्यानं चर्चा होणार आहे. एखाद दुसरा अपवाद वगळता जेजेशी ज्यांचा दुरान्वयानं देखील संबंध नाही अशा काही लोकांनी यासंदर्भात गैरसमज पसरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला असल्यामुळं आजच्या ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये त्या साऱ्यांनाच जाहीरपणे उत्तर दिलं जाणार आहे.
माझ्यासोबत या साऱ्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत चित्रकार आशुतोष आपटे देखील ! आजचा हा अचानक ठरलेला कार्यक्रम जेजेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी किंवा जेजेशी संबंधित असलेल्या कुणीही चुकवू नये अशी आमची नम्र विनंती आहे. आणखीन एक, यासंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न सतावत असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये खुशाल विचारा ! तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ह�� बांधील आहोत. जेजे संस्कृती म्हणजे काय ? याचं दर्शन आज आपल्याला सर्वांनाच घडवायचं आहे. ही संधी दवडू नका !
Related
Please login to join discussion