News

आकाश खेतावत यांना फ्लोरेन्स अकॅडमीची शिष्यवृत्ती जाहीर

मुंबईच्या आकाश खेतावत यांना इटलीच्या फ्लोरेन्स अकॅडमीची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत आकाश खेतावत यांना एक महिना इटली येथील फ्लोरेन्स अकॅडमी ऑफ आर्ट येथे चित्रकलेचे प्रशिक्षण मिळणार आहे. फ्लोरेन्स येथील या मानांकित संस्थेची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी जगभरातून कला विद्यार्थ्यांचे अर्ज संस्थेकडे येतात. आपल्या निवडक कलाकृती कलाकारांना फ्लोरेन्स अकॅडमीला मेल करायच्या असतात. या जगभरातील प्रवेशिकांमधून आकाश खेतावत यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. आकाश यांनी आपले बीएफए पेंटिंगचे शिक्षण जे के अकॅडमी येथून पूर्ण केले आहे. ‘चिन्ह’च्या ‘गच्चीवरील गप्पा’ आणि ‘कलाशिक्षण महाचर्चा’ वगैरे सारख्या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू आकाश खेतावत यशस्वीपणे काही वर्ष सांभाळत आहेत.

ज्या कला विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील वेबसाईटला भेट द्यावी अशी माहिती आकाश यांनी दिली.

Florence Academy of Art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.