News

अ‍ॅनिमेटर, स्टोरीबोर्ड आर्टीस्ट विनय ब्रह्मनिया यांचे निधन

मुंबईस्थित ऍनिमेटर, स्टोरीबोर्ड आर्टीस्ट व इलस्ट्रेटर विनय ब्रह्मनिया यांचे गंभीर आजाराने निधन झाले. ते ‘जे. जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट’चे सुवर्ण पदक विजेते होते.  मुंबई येथे ‘आर्ट स्टेशन’ हा त्यांचा स्टुडीओ होता. त्यांनी स्टोरी बोर्ड क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे.

युनिलिव्हर, प्रॉक्टर अ‍ॅंड गॅम्बल, डाबर, टाटा, फोर्ड अशा नामांकीत कंपन्यांसाठी त्यांनी स्टोरीबोर्ड आर्टीस्ट म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर २ हजार पेक्षा जास्त स्टोरीबोर्डसवर काम केले आहे. डिस्नी टीव्हीसाठी त्यांनी “मानव” या चित्रपटाची निर्मिती केली. पेंग्विन प्रकाशनातर्फे “अभिमन्यू” हे त्यांचे ग्राफीक नॉवेल २०१४ साली प्रसिद्ध झाले. त्याला समीक्षक आणि वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. गेमिंग क्षेत्रातही त्यांनी भरपूर काम केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. याच आजाराने त्यांचे निधन झाले. Chinha Art News तर्फे  विनय ब्रह्मनिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

विनय ब्राह्मनिया यांनी आपल्या कुंचल्याने सजवलेले ग्राफिक नॉव्हेल

 

विनय ब्रह्मनिया कृत ‘मानव’ चित्रपटाचा ट्रेलर

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.