News

वसेकर कुटुंबियांचे आवाहन

कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. सुभाष वसेकर यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी फोन/ ई-मेल मार्फत संपर्क साधून वसेकर कुटुंबियांना आधार दिला. सुभाष वसेकर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी वसेकर कुटुंबीयांनी सरांच्या जीवनावर स्मरणिका प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. प्रा. सुभाष वसेकर यांचे चिरंजीव पराग वसेकर यांनी  वसेकर सरांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आठवणी इमेल अथवा व्हाट्सअप मेसेजच्या स्वरूपात पाठवण्याचे आवाहन केले आहे. तेव्हा आपण किंवा आपल्या परिचितांपैकी जर कुणी प्रा. सुभाष वसेकर यांचे विद्यार्थी असाल तर आपल्या आठवणी सरांचे चिरंजीव पराग वसेकर यांना पाठवाव्यात.
पराग वसेकर यांचा ई-मेल : psvasekar@gmail.com
Whatsapp : +1-407-403-4943

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.