News

आर्ट बेरु तर्फे चित्रकला स्पर्धेचं आयोजन

आर्ट बेरु ही बेंगलोर येथील आर्ट गॅलरी आहे. या गॅलरीतर्फे व्यावसायिक आणि विद्यार्थी अशा दोन गटात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी विषयाचे बंधन नसून कलाकार ऑइल, ऍक्रॅलिक, मिक्स मीडिया, वॉटरकलर, प्रिन्टमेकिंग, फोटोग्राफी अशा विविध माध्यमातील कलाकृती पाठवू शकतात. स्पर्धकांनी ५०० रुपये प्रवेश शुल्क भरावयाचे आहे. आपली कलाकृती ही ऑनलाईन पद्धतीने इमेज स्वरूपात (सहा बाय आठ इंच)  पाठवायची आहे. स्पर्धेसाठी कलाकृती पाठवण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे. व्यावसायिक गटातून सहा विजेत्या चित्रकारांची निवड करण्यात येईल. या सहा विजेत्यांना प्रत्येकी पंचवीस हजाराचे पारितोषिक दिले जाईल. विद्यार्थी गटातून सहा विजेत्यांची निवड केली जाईल आणि प्रत्येकी दहा हजाराचे पारितोषिक दिले जाईल.

****

या स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले जाईल आणि विक्री झालेल्या चित्रातील फक्त वीस टक्के रक्कम संस्थेकडे जाईल. स्पर्धेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://artberu.com/national-level-art-contest-2023/

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.