News

छोट्यांसाठी ‘चित्रोत्सव’ स्पर्धेचे आयोजन

भारतीय जनता पक्ष, ठाणे आणि सोनल आर्ट स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र दिनानिमित्त चित्रोत्सव स्पर्धेचे आयोजन दि 01 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे तीन  गट तयार करण्यात आले आहेत. पहिला गट इयत्ता 1 ली ते 3 री चा आहे. या गटासाठी स्पर्धेचा विषय महाराष्ट्रातील जंगलातील आवडता प्राणी किंवा नवी मुंबईतील पाहुणे पक्षी फ्लेमिंगो हे आहेत. दुसरा गट हा इयत्ता 4 थी ते 6 वी चा आहे. या गटासाठी स्पर्धेचा विषय महाराष्ट्रातील किल्ला किंवा महाराष्ट्रातील सण हा आहे. तर तिसरा गट हा इयत्ता 7 वी ते 10 वी चा असून या गटासाठी स्पर्धेचा विषय महाराष्ट्रातील एक योद्धा किंवा महाराष्ट्रातील महत्वाचे स्मारक हा आहे.

स्पर्धेची वेळ सकाळी 8:00 ते 10:00 आहे.
पत्ता : गडकरी रंगायतन, तलावपाळी, ठाणे  400601

स्पर्धकांनी स्पर्धेसाठीचे सर्व साहित्य, बोर्ड/पॅड सोबत आणावयाचे आहे, मात्र कागद(28X38सेमी) आयोजकांतर्फे देण्यात येईल.

स्पर्धेसाठी नोंदणी  (नि:शुल्क), खालील क्रमांकावर करता येईल.
9920256096, 8591505495
अधिक माहितीसाठी खालील पोस्टर पाहावे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.