News

प्रवेश परीक्षा नोंदणी सुरु 

महाराष्ट्राच्या कला संचालनालय आणि सीईटी सेलतर्फे घेण्यात येणाऱ्या आर्ट कॉलेज म्हणजेच महा एएसी सीईटी प्रवेश परीक्षा २०२३ची नोंदणी सुरु झाली आहे. या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि जेजे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट, शासकीय कला व अभिकल्प  महाविद्यालय नागपूर, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय औरंगाबाद तसेच इतर खाजगी कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी.इच्छुक उमेदवार या वेबसाईटवर आपली नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात.

या परीक्षेसाठी नाव नोंदणीचे नियम पुढील प्रमाणे आहेत.
एम.ए.एच.-ए.ए.सी.-सी.ई.टी.-२०२३ ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची एच.एस.सी. (कोणत्याही शाखेतील) परीक्षा किंवा त्यास समकक्ष परीक्षा इंग्रजी या विषयासह उत्तीर्ण केलेली असावी किंवा एच.एस.सी. / समकक्ष परीक्षा दिलेली असावी.

संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) / विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.

दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

एम.ए.एच.- ए.ए.सी.- सी.ई.टी.-२०२३ शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व अखिल भारतीय उमेदवारी असलेल्या सर्व संवर्गांच्या उमेदवारांसाठी रु.१७००/-

महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी(सी) / एन.टी(डी) / विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. १२००/-

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.