News

‘रंगा’मध्ये प्रीतम देऊस्कर !

दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फ़े सादर केल्या जाणाऱ्या ‘रंगा येई वो’ या कार्यक्रमात येत्या शनिवारी सायंकाळी ५ वाजता चित्रकार प्रीतम देऊस्कर यांच्यावर विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. श्री देऊस्कर हे उत्तम प्रिंट मेकर मानले जातात. ठाण्यामध्ये ब्राम्हण सोसायटीत त्यांचा छोटासा पण अत्यंत सुसज्ज असा स्टुडिओ आहे. तिथंच ते सतत प्रिंट मेकिंगचे नवे नवे प्रयोग करीत असतात. तिथं ते लहान मोठी वर्कशॉप्स देखील घेत असतात. त्याच स्टुडिओत या कार्यक्रमाचे सादरकर्ते अभिनेते प्रमोद पवार यांनी चित्रकार प्रीतम देऊस्कर यांची मुलाखत घेतली आहे. ग्राफिक म्हणजे काय ? प्रिंट म्हणजे काय ? चित्रकार मंडळी अभिव्यक्ती प्रकटीकरणासाठी या माध्यमाचा वापर कसा करतात ? अशा असंख्य गोष्टी जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आवर्जून पहा. रविवार दि २४ जुलै रोजी दुपारी दोन वाजता आणि रात्री साडेआठ वाजता देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जातो.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.