News

ज्येष्ठ चित्रकर्ती वैजयंती जाधव यांचे निधन

पुणे येथील ज्येष्ठ चित्रकर्ती वैजयंती जाधव यांचे शुक्रवारी (दि.१९ ऑगस्ट) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या अभिनव कला महाविद्यालयाच्या १९८१ बॅचच्या विद्यार्थिनी होत्या. पुण्यात गेली ४५ वर्षे त्यांचे वास्तव्य होते. सिरॅमिक, म्यूरल माध्यमातील त्या महत्वाच्या आर्टिस्ट होत्या. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी सिरॅमिक वर्क शिकवले. गुरु दादा साळवी यांच्याकडे त्यांनी सिरॅमिक, म्युरलची सुरुवात केली. त्या पेंटींग देखील करत असत. जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई तसेच दिल्ली, बेंगलोर, कलकत्ता अशा अनेक ठिकाणी त्यांनी अनेक प्रदर्शने भरवली व त्या काळात ती खूप गाजली. अत्यंत मनमोकळ्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या वैजयंती जाधव या होतकरू चित्रकारांच्या आधारस्तंभ होत्या. अनेक चित्रकारांना त्यांनी मदत केली. वैजयंती जाधव यांना ‘Chinha Art News’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.