News

‘आर्टिवल’ प्रदर्शन स्टॉल बुकिंग सुरु

दि ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान ‘आर्टिवल’ प्रदर्शन द आर्केड, वर्ल्ड ट्रेंड सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील ३०० कलाकारांच्या ३००० कलाकृती प्रदर्शित होतील. आर्टिवल हे एक वेगळेपणा जपणारे कला प्रदर्शन आहे. २०१८ मध्ये याची सुरुवात झाली. कलाकार आणि कालादालने, कला व्यावसायिक, ग्राहक, वास्तुविशारद, गृहसजावटकार, ज्येष्ठ कलाकार या सर्वांमध्ये सुसंवाद व्हावा, उदयोन्मुख कलाकारांना ज्येष्ठांकडून काही अनुभवाचे बोल ऐकायला मिळावेत, व्यावसायिक बाजू समजून घ्याव्यात यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येथे नवीन कलाकारांना जुन्या जाणत्या कलाकारांसोबतच आंतरराष्ट्रीय कलाकारांशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळते. या सगळ्या गोष्टींसाठी आर्टिवल ही एक उत्तम संधी आहे. या प्रदर्शनात ग्राहकांना देखील खरेदीसाठी अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध असतात. यामुळेच आजघडीला कलाकारांसाठी प्रदर्शन हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे अधिकाधिक कलाकारांनी या प्रदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन ‘आर्टिवल’ प्रदर्शनाचे आयोजक शरद गुरव यांनी केले आहे.

या प्रदर्शनात आपले स्टॉल बुकिंग करण्यासाठी 99208 04573 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. किंवा artival18@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करावा.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.