News

चित्रकलेसाठीच्या विविध साहित्यावर ७०% पर्यंत सूट

‘आर्ट लाउंज’ या कंपनीकडून चित्रकलेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यावर ७०% एवढी भव्य सूट जाहीर करण्यात आली आहे. मागील १३ वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. दरवर्षी १५ ऑगस्टपासून या भव्य सेल चे आयोजन केले जाते.
त्यांच्या काळाघोडा येथील दुकानात विविध आर्ट प्रॉडक्टस वर ७०% पर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे. तर वेबसाईटवरून वस्तू खरेदी करण्यासाठी १५% सवलत देण्यात येत आहे. आपल्या दृश्यकलेचा उत्कृष्ट नमुना सादर करण्यासाठी प्रत्येक कलाकाराला चांगल्या दर्जाची साधने सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावीत, हा या मागील उद्देश असल्याचे ‘आर्ट लाउंज’ ने म्हटले आहे.
ड्राईंग आणि इलस्ट्रेशन, ब्रश आणि पेंटींग टुल्स, सरफेसेस, पेंट्स, मिडियम,आर्ट स्टुडिओ, प्रिंट मेकींग या विविध वस्तू ‘आर्ट लाउंज’ च्या काळाघोडा येथील दुकानात आणि www.ARTLOUNGE.IN या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. नवोदीत चित्रकारांसाठी आपल्या वर्षभराच्या कलासादरीकरणासाठी लागणाऱ्या वस्तूची खरेदी करण्याची ही एक चांगली संधी आहे. विविध ब्रॅंडेड वस्तूंवर देखील येथे एकावर एक मोफत तसेच २० ते ७० टक्के सूट अशी मोठी सूट देण्यात आली आहे.

 

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.