News

भगवान चव्हाण आणि  स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी !

मूळचे सोलापूरचे पण नंतर चेन्नईच्या ‘ चोला मंडल आर्टिस्ट व्हिलेज ‘ मध्ये स्थायिक झालेले चित्रकार भगवान चव्हाण यांच्या अलीकडच्या चित्रांचं प्रदर्शन बंगळुरूच्या कर्नाटक चित्रकला परिषदेच्या कलादालनात दि. ८ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार असून ते १४ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे .भारतीय स्वातंत्र्याची जी पंचाहत्तरी आपण साजरी करीत आहोत तीत आपण चित्रकार म्हणून सहभागी व्हायला हवं आहे असं भगवान चव्हाण याना मनापासून वाटू लागलं आणि त्यांनी या पंचाहत्तराव्या वर्षी ७५ चित्रं रंगवायचं मनाशी निश्चित केलं . त्यातली सुमारे पन्नासएक चित्रं आता तयार झाली आहेत . त्या चित्रांपैकी ३५ चित्रं त्यांनी या प्रदर्शनात मांडायचं निश्चित केलं आहे . उर्वरित चित्रं पुढील तीन चार महिन्यात तयार होताच या ७५ चित्रांचं प्रदर्शन चेन्नईमध्येच भरवलं जाणार आहे .या दोन्ही प्रदर्शनात प्रदर्शित होणारी  त्यांची ही सारी चित्रं ही आपल्या राष्ट्रध्वजाच्या आकाराची म्हणजे दोन बाय तीन फूट आकाराची आहेत .

जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकत असतानाच भगवान चव्हाण यांनी ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता . इतकंच नाही तर फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते पॅरिसला उच्च शिक्षणासाठी गेले होते . तिथून आल्यावर मात्र त्यांनी स्थायिक होण्यासाठी  मुंबई ऐवजी चेन्नई हे शहर निवडलं . त्यानंतर काही कालावधीतच त्यांना चोलामंडल या आर्टिस्ट व्हिलेज मध्ये स्टुडिओ बांधण्याची संधी मिळाली . मधला काही काळ संघर्षाचा गेला . पण आता मात्र ते पूर्णपणे चित्रांमध्येच रमून गेले आहेत . सदरचं  त्यांचं हे प्रदर्शन त्यांच्या कारकीर्दीतलं महत्वाचं प्रदर्शन ठरलं तर आश्चर्य वाटू नये . ‘ चिन्ह’च्या ऑनलाईन आर्ट गॅलरीत देखील हे प्रदर्शन ८ ऑगस्ट पासून पाहता येईल.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.