News

चित्रकला स्पर्धेचे आयोजन

इंडिया हाऊस आर्ट गॅलरीतर्फे पुणे येथे दि २२ जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे. सर्व सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेसाठी सकाळी साडेनऊ वाजता डेक्कन येथील संभाजी पार्क येथे उपस्थित राहायचे आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी रंग आणि इतर साहित्य सोबत आणायचे आहे. स्पर्धेसाठी कागद आयोजकांकडून देण्यात येईल. ही स्पर्धा निशुल्क असून पहिली ते दहावी वर्गातील विद्यार्थी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी थेट आयोजनस्थळी यावे. स्पर्धेसाठी ५० पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी खालील माहितीपत्रक पाहावे.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.