News

‘ गप्पा’मध्ये उत्खनन आणि वस्तुसंग्रहालयं !

येत्या शनिवारी म्हणजे ११ जून रोजी सायंकाळी ०५-३० वाजता महाराष्ट्राचे पुरातत्व संचालक तेजस गर्गे गच्चीवरील गप्पामध्ये सहभागी होणार आहेत . खरं तर हा आपल्या संस्कृतीशी किंवा जीवनाशी देखील म्हणा हवं तर असा महत्वाचा विषय . पण सर्व सामान्य माणसांना सोडाच पण ज्ञानी म्हणवल्या जाणाऱ्या माणसांना देखील हा विषय काहीसा  अनभिज्ञ असतो . म्हणजे उदाहरणार्थ काय चालतं या खात्यात काम ? किंवा हे खातं मुळातच हवंच कशाला असे प्रश्न अनेकांना सतावत असतात आणि या साऱ्याच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत म्हणूनच पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक श्री तेजस गर्गे याना ‘ चिन्ह’नं गप्पांच्या कार्यक्रमात खास सहभागी करून घेतलं आहे.

नाशिकचे प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे तेजस हे ज्येष्ठ चिरंजीव . कदाचित त्यामुळे देखील हा विषय गच्चीवरील गप्पांमध्ये आला असावा . पण या साऱ्याचा संबंध आपली संस्कृतीशी असल्यामुळं मग एका प्रश्नातून असंख्य प्रश्नांचे फाटे फुटू लागले आणि मग पुरातत्व  म्हणजे नेमकं काय ? वस्तुसंग्रहालयं आपल्याला  हवीतच का  ? या साऱ्यांची  आपल्याला  खरोखरच  गरज आहे का  ? इथपासून ते या कार्यक्षेत्रात आता नेमकं काय चाललं आहे? कोणतं नवं उत्खनन सुरु झालं आहे ? कोकणात मोठया प्रमाणावर कातळशिल्पं सापडू लागली आहेत त्यांचं नेमकं काय केलं जाणार आहे ? अशा अनेक प्रश्नांबाबत या कार्यक्रमात मोकळेपणानं चर्चा केली जाणार आहे . पाहायला विसरू नका !

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.