News

हसबनीस यांच्या चित्रांचे प्रदर्शन

चित्रकार चिंतामण हसबनीस यांच्या चित्रांचे प्रदर्शन फर्ग्युसन कॉलेजच्या लोअर रिक्रीएशन हॉलमध्ये १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन फर्ग्युसन कॉलेजच्या एनेबलिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांतर्फे “वर्ल्ड साईट डे” निमित्त आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन हे पारंपरिक पद्धतीने अर्थात फित कापून न करता उपस्थित रसिकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून करण्यात येणार आहे. “Eyesight is Optional, Vision is Mandatory” या प्रदर्शनाच्या मिशन स्टेटमेण्टचा प्रत्यय उपस्थित रसिकांना यावा यासाठी अभिनव पद्धतीने उदघाटन करण्यात येईल. चिंतामण हसबनीस यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रांचा अनुभव डोळस व्यक्तींबरोबर अंध रसिकही घेऊ शकतात.
या प्रदर्शनाला जास्तीत जास्त कला रसिकांनी भेट द्यावी असे आवाहन चिंतामण हसबनीस यांनी केले आहे.
प्रदर्शनाची वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ५
प्रदर्शनाचा पत्ता :
लोवर रिक्रिएशन हॉल
फर्ग्युसन कॉलेज, शिवाजी नगर, पुणे – 411004
****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.