News

कल्पकतेला शब्दांची गरज काय?

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे. लोकसत्ता या वृत्तपत्रातून त्यांची व्यंगचित्रे आपण रोज बघतो. यंदाच्या कालनिर्णय दिवाळी अंकात प्रशांत कुलकर्णी यांनी ख्रिस्तोफ निमन या चित्रकार, व्यंगचित्रकारावर परिचयात्मक लेख लिहिला आहे. या लेखातून आपल्याला क्रिएटिव्हिटी म्हणजे काय ते कळते. कल्पकतेचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे ती क्लीष्ट नसावी तर समजण्यास अतिशय सोपी असावी. त्याप्रमाणे ख्रिस्तोफ निमन यांची चित्रे असतात. आपल्याकडे शि. द. फडणीस यांची चित्रे जशी कल्पक आणि शब्दांचा वापर न करणारी असतात तशाच पठडीतील ख्रिस्तोफ निमन यांची चित्रे असतात. निमन मात्र आपल्या चित्रातून केवळ हलके फुलके विषय न मांडता टोकदार राजकीय भाष्य देखील करतात तेही शब्दांचा कुठलाही वापर न करता.

खरं तर ख्रिस्तोफ यांची चित्रे कुठल्याही विशिष्ट साच्यात बसत नाहीत. ती एकाच वेळी व्यंगचित्रेही असतात आणि चित्रेही. कधी कधी फोटोग्राफी आणि चित्र यांचा कल्पक मिलाफही असतो. त्यामुळे ती एक स्वतंत्र शैलीच तयार करतात.न्यूयॉर्कर या जगप्रसिद्ध साप्ताहिकाची मुखपृष्ठे ख्रिस्तोफ निमन करतात. मोज्यांचा विशिष्ट रचनेमध्ये फोटो काढून काही ब्रशच्या फटकाऱ्याने त्याचं डायनॉसॉरमध्ये रूपांतर करणे किंवा स्केचपेनच्या फोटोवरून स्त्री पुरुषांची लढाई दाखवणे यासारखी कल्पक चित्रे बघून निमन यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा अंदाज येतो. तर अमेरिका जेव्हा अफगाणिस्तान सोडून गेली तेव्हा केलेलं न्यूयॉर्करचं मुखपृष्ठ निमन यांच्या कल्पक राजकीय भानाची जाणीव करून देतं.

आपल्याला अनोळखी असलेल्या एका नवीन चित्रकाराचं अफाट काम जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचावा . ख्रिस्तोफ यांच्या कामाच्या शैलीबद्दल आणि त्यांच्या जीवन प्रवासावर या लेखातून अधिक जाणून घेता यायला हवे होते असे असे वाटत राहते . त्यामुळेच की काय लेख काहीसा लवकर संपवलेला वाटतो. कदाचित पानांच्या मर्यादेमुळे हा संपादकीय निर्णयही असू शकतो. किंवा ख्रिस्तोफ निमन यांची चित्रेच इतकी बोलकी आहेत, की त्यांना शब्दांची गरज नसावी.

*****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.