News

महिला फोटो पत्रकार : एका चकरावून टाकणारं विश्व !

‘चिन्ह’चा अंक चालू असता तर मला प्रकाशित करायला आवडला असता असा लेख म्हणजे ‘ महा अनुभव ‘  या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला चित्रकार नितीन दादरावाला यांचा ‘ सुझन मेसेलस ‘ या लॅटिन अमेरिकन फोटो पत्रकाराच्या भन्नाट कर्तृत्वाचा परिचय करुन देणारा प्रदीर्घ लेख . पहिल्या पानावरच्या बंदूकधारी सैनिकांच्या समोरून शांतपणे रस्ता क्रॉस करणाऱ्या सुझनच्या  फोटोनंच आपलं लक्ष वेधून घेतलं जातं . आणि मग नंतर तर सुझनच्या फोटोग्राफीतल्या कर्तृत्वानं आपण तर अगदी थिजून जातो.

गेली काही वर्ष आपण फोटोग्राफीच्या क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या जगभरातल्या फोटोग्राफर्सचं अदभूत काम नितीनच्या नजरेतून वाचतोय -पाहतोय . मध्यंतरी त्यानं लोकवाङ्मय पत्रिकेसाठी लिहिलेल्या लेखांचं ‘प्रतिमा आणि प्रचिती ‘ हे अप्रतिम पुस्तक देखील प्रकाशित झालं . त्या पुस्तकानंतर त्यानं जगभरातल्या महिला फोटोग्राफर्सच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि त्या अभ्यासातून त्यानं लिहिलेले लेख प्रामुख्यानं ‘ महा अनुभव ‘ दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले .
२०१८ सालच्या अंकात प्रसिद्ध झालेला ‘ विवियन मेयरच्या शोधात ‘ हा लेख तर वाचकाला अक्षरशः थिजवून टाकणारा होता . अमेरिकेतला एक तरुण पत्रकार कुतूहलापोटी जुन्या बाजारातून डेव्हलप न केलेल्या रोल्सची खोकी ( आपल्याकडची खोकी वेगळी ) खरेदी करतो. आणि त्यातून त्याला ६० – ७० वर्षांपूर्वी काढल्या गेलेल्या फोटोंचा आणि ते काढणाऱ्या विक्षिप्त म्हणता येईल अशा  महिला फोटोग्राफरचा शोध लागतो. नितीनच्या शब्दात या अक्षरशः अदभूत अशा प्रवासाचं वर्णन वाचणं हा माझ्यासाठी तरी अनुभव होता . तेव्हापासून नितीननं लिहिलेल्या लेखांची मी आतुरतेनं वाट पहात असतो .
त्याचा यंदाचा लेखही असाच थिजवून टाकणारा आहे . म्हणूनच ‘पॅलेट’ या कार्यक्रमात त्याला बोलवायचं  आणि त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या असं मी ठरवून टाकलं होतं . सुदैवानं नितीन बऱ्या मूडमध्ये असावा . त्यानं होकारही दिला आणि मग न थांबता  लगेचच आम्ही त्या मनमोकळ्या गप्पांचा  व्हिडीओ बनवून देखील टाकला.’ चिन्ह’च्या  युट्यूब चॅनलवर तो अपलोड देखील केलाय. अगदी आवर्जून पाहा ! आणि हो नितीनचे हे सारे लेख वाचायची तीव्र इच्छा झाली तर ९००४० ३४९०३ या ‘ चिन्ह’च्या व्हाटसऍप नंबरवर स्वतःच्या नामोल्लेखासह nitin हा मेसेज पाठवा . लेखाच्या पीडीएफ पाठवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करु. पॅलेट हा ‘चिन्ह’चा नवा कार्यक्रम आवर्जून पहा . ‘चिन्ह’च्या चॅनलला लाईक करा , सबस्क्राइब करा ! आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींनाही त्याविषयी अवश्य सांगा !
****

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ बघू शकता.

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.