News

कोरोना व्हायरस शिल्प प्रदर्शन

जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टच्या माजी विद्यार्थीनी डॉ. अदिती वैद्य यांनी कोरोना विषाणूची वैज्ञानिक प्रतिकृती तयार केली आहे. प्रत्यक्षात कोरोना विषाणूला कोणताही रंग नसतो. त्यामुळे रेझिन- ऍक्रेलिक हे माध्यम मॉडेल तयार करण्यासाठी वापरण्यात आले. ही १५ इंचांची फिरती प्रतिकृती, मूळ व्हायरसच्या सुमारे ४०,००,०००(चाळीस लाख) पट विस्तृत आवृत्ती आहे. डॉ. अदितीने तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे आकर्षक शिल्प तीन महिन्यांत तयार केले.
कला, वैज्ञानिक कामगिरी आणि प्रभावी कथाकथन – या तिघांचा संगम असणाऱ्या ‘Vaccines: Injecting Hope’ या नवीन फिरत्या प्रदर्शनीत, ही करोना व्हायरसची प्रतिकृती मांडण्यात आली आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी, श्री अर्जुन राम मेघवाल, माननीय सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री यांच्या शुभहस्ते, दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान केंद्रात करण्यात आले. हे फिरते प्रदर्शन सांस्कृतिक मंत्रालय-भारत सरकार व विज्ञान संग्रहालय समुह- इंग्लंड, यांनी संयोजित केले आहे. हे प्रदर्शन मुंबई येथे २३ फेब्रुवारी रोजी नेहरू सेंटर, वरळी येथे बघता येईल.
अधिक माहितीसाठी – https://vaccine-injectinghope.in/

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.