News

‘मुक्त शब्द’ मध्ये अभिव्यक्तीवर वैचारिक मंथन

छायाचित्रकार अभिनव काफरे यांनी न्यूड फोटोग्राफीवर पुस्तक करायचं ठरवलं असता संध्या गोखले यांना फोटो ओळी लिहिण्याची विनंती केली होती. या पुस्तकाचे काम करताना संध्या गोखले यांच्या मनात जे वैचारिक वादळ उठले ते त्यांनी मुक्त शब्द दिवाळी अंकासाठी ‘अर्मागेदन – अभिव्यक्तीसाठी लढा’ या लेखात शब्दबद्ध केलं आहे. 

मुक्तशब्द दिवाळी अंक हा वैचारिक लेखनासाठी ओळखला जातो. त्यामुळे  या लेखातही नग्नता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर लेखिकेची वेगळी आणि धाडसी मते वाचता येतील. (धाडसी यासाठी की आजही न्यूड फोटोग्राफी केली म्हणून रणबीर सिंगवर गुन्हा दाखल होतो.) 

लेखिका या लेखात मांडतात, शतकानुशतके स्त्रीने कसे दिसावे याकडे पुरुषांच्या नजरेतून  पाहण्यात आले. प्रस्थापित मापदंडात स्त्रीचे शरीर बसणे अनिवार्य करण्यात आल्याने आजही स्त्री समाजमाध्यमांचा वापर करताना तेच फोटो टाकते जे पुरुषांच्या दृष्टीने सुंदर असतात. मग कुणी भेगा असलेल्या टाचा, केस असलेल्या पोटऱ्या किंवा ओठावरची लव फोटोमध्ये दिसू देत नाही! स्त्री समाजमाध्यमांचा मुक्त वापर करत आहे पण ती खरंच मुक्त झाली आहे का? 

आजही बहुतांश न्यूडस ही स्त्रीचीच केली जातात. पुरुषांची न्यूड फोटोग्राफी किंवा पेंटिंग फार कमी आहेत. अर्मागेडन म्हणजे मानवी वंशविरुद्ध अंतिम युद्ध. अभिव्यक्तीची शतकानुशतकांपासून होणारी गळचेपी याविरुद्ध अर्मागेडन होत आहे आणि ते जिंकणे महत्वाचे आहे असं लेखिकेचं स्पष्ट मत आहे. 

हा लेख अतिशय उत्तम आहे. वाचकांना केवळ ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’,  जो हल्ली परवलीचा शब्द झाला आहे त्याबद्दल नेमकी माहिती मिळेलच शिवाय जागतिक परिप्रेक्ष्यात हा विषय समजून घेता येईल.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.