News

सिमरोझात ‘अमलगमेशन १०’ प्रदर्शन

एक्सपोपेडिया तर्फे आयोजित केलेल्या “अमलगमेशन १०” या समूह चित्र, शिल्प आणि प्रिंट प्रदर्शनात २० समकालीन कलाकारांचा समावेश असून, या प्रदर्शनाचं आयोजन सिमरोझा आर्ट गॅलरी, भुलाभाई देसाई रोड, मुंबई येथे दि १९ ते २२ एप्रिल २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचं संयोजन अपरिमिता सप्रू यांनी केलं आहे.

या प्रदर्शनात रसिकांना प्रथितयश कलाकारांच्या चित्र, प्रिंट आणि शिल्प कलाकृतींचा आस्वाद घेता येईल. या प्रदर्शनात प्रकाश बाळ जोशी, पराग बोरसे, आशिफ होसेन, सत्यजित वरेकर, ओम स्वामी, राखी शाह, शोभा शेटे, नंदिनी दास, अनिशा गुप्ता, त्राप्ती बडजातीया, वर्षा बलवानी कुकरेजा, प्रज्ञा सामोर, अलका पांडे, सुरेखा शेट्टी, प्रियांका तायल, लोमिता कमलेश नंदा, अभिजित बोस, गीतू कलानी, सोनाली सूरमा या कलाकारांनी भाग घेतला आहे.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.