News

जहांगीरमध्ये आदित्य फडके

चित्रकार आदित्य फडके याचं ‘कारखाना’ हे एकल चित्र प्रदर्शन दि 25 एप्रिल ते 01 मे 2023 दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलं आहे. ‘कारखाना’ या चित्र प्रदर्शनांतर्गत फडके यांनी विविध वाहने, जुने मॉडेल्स आणि वाहनांच्या वर्कशॉपमधील दृश्ये कॅनव्हासवर रेखाटली आहेत. आदित्य फडके यांची रेखाटनावरील पकड प्रशंसनीय आहे. तसेच वॉटरकलर या तुलनेनं काहीशा कठीण माध्यमात त्यांनी काम केलं आहे. पण माध्यमावर प्रभुत्व मिळवल्यानं ही चित्रं तंत्रशुद्ध आणि मोहक झाली आहेत. आदित्य फडके हे पुण्यातील चित्रकार आणि कलाशिक्षक मिलिंद फडके यांचे सुपुत्र आहेत. प्रदर्शनाची वेळ ही सकाळी 11:00 ते संध्याकाळी 07:00 वाजेपर्यंत आहे.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.