News

जहांगीरमध्ये अन्वर हुसेन

चित्रकार अन्वर हुसेन यांचे ‘द सिम्फनी ऑफ टाइम’ चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि 9 ते 15 मे 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली 4 – 5 वर्ष या चित्र मालिकेवर अन्वर हुसेन यांनी काम केलं आहे. यामध्ये रेखाटनं, तपशील आणि विचार याचा मोठा भाग होता. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात या सिरीज मधले बहुतांश कॅनव्हास हुसेन यांनी पूर्ण केले. ही सगळी चित्रं येत्या प्रदर्शनात रसिकांना पाहता येतील. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अन्वर हुसेन यांचं हे चौथं एकल प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचं उदघाटन प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांच्या हस्ते होणार आहे.

अन्वर हुसेन यांची चित्रं ‘चिन्ह’च्या ऑनलाईन आर्ट गॅलरीमध्ये दि 10 मे पासून रसिकांना पाहता येतील.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.