News

रमेश थोरात यांचे चित्र प्रदर्शन

दि १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान चित्रकार रमेश थोरात यांचे ‘सॅक्रेड चान्ट्स’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन दि १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, आर्किटेक्ट रमेश एडवणकर आणि आर्ट कन्सल्टन्ट प्रतीक एडवणकर यांच्या हस्ते झाले. थोरात यांच्या या चित्रमालिकेत पारंपरिक महाराष्ट्रीयन जागरण, गोंधळ यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातील प्रतीकांचा वापर केला आहे. लोककथांमधील प्रतिकांचाही वापर त्यांच्या चित्रांमध्ये केला आहे.
कॅनव्हासवरील सांगीतिक अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी अधिकाधिक कलारसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन रमेश थोरात यांनी केले आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी सात आहे.

प्रदर्शनाचा पत्ता:
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई – ४०० ००१

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.