News

योगेश शिरवडकर यांचे प्रदर्शन

चित्रकार योगेश शिरवडकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि २२ ते २८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ह्या प्रदर्शनात चित्रकाराने मानवी आयुष्यात त्याला विविध प्रसंगी धारण कराव्या लागणाऱ्या मुखवट्यांची वैशिष्ट्येव प्रसंगानुरूप त्यात आढळणारे वैविध्य ह्या संबंधी आपल्या चित्रमाध्यमातून प्रकाश टाकला आहे.
योगेश शिरवडकर यांनी साऊथ वेल्स विद्यापीठ, सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे M. A. in Fine Arts ( Painting ) चे शिक्षण पूर्ण केले आहे. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण तंत्र व शैलीचा कलात्मक वापर करून तयार केलेली चित्रे ठेवली आहेत. त्यात मानवी जीवनात असणारे विविधलक्षी मुखवट्यांचे महत्व व त्यांची उपयुक्तता ह्यावर आपल्या चित्रमाध्यमातून वैचारिक संकल्पनांवर आधारित चित्रसंपदा ठेवली आहे. त्यात प्रामुख्याने आनंद, चिंता, भीति, स्वीकार, प्रेम, आवड, दुःख विरह, राग, अगतिकता, पुरुषी अहंभाव तसेच स्त्रीदाक्षिण्य, निजरूप लपविण्याचा व त्याची अन्य रूप प्रकटीकरणाची मानसिकता ह्या विविध मनोविकारांचे रसिकांना दर्शन होते.

प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन योगेश शिरवडकर यांनी केले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता :
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई – ४०० ००१

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.