News

अतुल दोडिया यांचे प्रदर्शन

चित्रकार अतुल दोडिया यांचे चित्र प्रदर्शन केमोल्ड प्रेस्कॉट रोड आर्ट गॅलरी येथे दि 12 ते 25 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे शीर्षक ‘डॉ. बॅनर्जी इन डॉ.कुलकर्णीज होम अँड अदर पेंटिंग्ज’ असे आहे. या चित्र मालिकेत एकूण 24 कलाकृतींचा समावेश आहे. अतुल दोडिया यांनी भारतीय सिनेमातील प्रभावी व्यक्तिरेखांपासून प्रेरणा घेऊन या चित्रांची निर्मिती केली आहे. चित्रपट क्षेत्रात 24 या आकड्याचे खूप महत्व असते. कारण प्रत्येक सेकंदात 24 फ्रेम्स असतात. त्यामुळे ही 24 चित्रे भारतीय सिनेमाचे प्रतीक आहेत. कोरोना काळात दोडिया यांनी खूप चित्रपट पाहिले आणि यातूनच या चित्रमालिकेच्या निर्मितीची प्रेरणा त्यांना मिळाली.
या प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन अतुल दोडिया यांनी केले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.