News

प्रकाश नेवासकर यांचे प्रदर्शन

छायाचित्रकार प्रकाश नेवासकर यांचे ‘सीन अनसीन’ हे छायाचित्रांचे प्रदर्शन कर्वे रोड, पुणे येथील पीएनजी आर्ट गॅलरी येथे दि २१ ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते होईल. प्रकाश नेवासकर हे ‘जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट’चे माजी विद्यार्थी असून ते जाहिरात क्षेत्रात काम करतात. नेवासकर हे प्रामुख्याने निसर्गाचे छायाचित्रण करतात. त्यातही प्रामुख्याने झाडांचं चित्रण हा नेवासकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

नेवासकर यांच्या मते निसर्ग त्यांना विषयाची कमतरता कधीच पडू देत नाही. आपल्या छायाचित्रातून ते निसर्गाचा गंध रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. जर कोणी पारिजातकाच्या फुलाचे छायाचित्र बघत असेल तर त्या छायाचित्रातून गंध दरवळायला हवा. तरच ते रसिकांच्या मनापर्यंत पोहोचेल.

नेवासकर आपल्या प्रत्येक छायाचित्रातून पेंटिंग दिसेल असा प्रयत्न करतात. निसर्गाला जसेच्या तसे कुठल्याही बाह्य प्रक्रियेशिवाय मूळ स्वरूपात ते आपल्या छायाचित्रात उतरवतात. अनेकदा क्लोजअप शॉट्समधून अमूर्त कलाकृतीचा आभास निर्माण होतो, पण जवळून पाहिले असता ते छायाचित्र आहे हे लक्षात येते. साध्या सोप्या विषयामधून अमूर्त कलाकृती निर्माण करणे हे नेवासकर यांच्या फोटोग्राफीचे बलस्थान आहे. ही अमूर्तता अबोध नाही तर मनाला आनंद देणारी आहे. नेवासकर सांगतात एखादे छायाचित्र जमून आले की माझ्या मनाला आनंद मिळतो. आणि जेव्हा ही छायाचित्रे पाहून रसिक सुखावतात तेव्हा माझा आनंद द्विगुणित होतो.नेवासकर यांची छायाचित्रे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर खूप नावाजली गेली आहेत.

या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ८.३० वाजेपर्यंत आहे. प्रदर्शन मंगळवार ते रविवार खुले राहील याची रसिकांनी नोंद घ्यावी.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.