News

बजाज गॅलरीत प्रियांका तयाल

चित्रकार प्रियांका तयाल यांचे ‘एक्सप्लोरिंग द अननोन’ हे चित्र प्रदर्शन दि 02 ते 07 मे 2023 दरम्यान कमलनयन बजाज आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रियांका यांच्या चित्रांची प्रेरणा निसर्ग आहे. त्याचबरोबर निरीक्षण आणि जीवनातील अनुभव या कलाकृतींच्या निर्माणात महत्वाची भूमिका पार पाडतात. मुंबई हे प्रियांका यांचे लाडके शहर आहे. या शहरात राहण्याचा अनुभव त्यांना चित्र काढण्यासाठी प्रेरित करतो. प्रियांका यांची अमूर्त सिटीस्केप्स याच प्रेरणेमधून तयार झाली आहेत.
ही चित्र मालिका तयार करण्यासाठी प्रियांका यांनी अनेक प्रयोग करून स्वतःशी शैली शोधली आहे. प्रियांका यांनी प्रामुख्याने एक्रलिक माध्यमात काम केले आहे.
हे प्रदर्शन सकाळी 11:00 ते संध्याकाळी 07:00 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले असेल. अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.