News

रहेजा स्कूल ऑफ आर्टचे वार्षिक प्रदर्शन… 

मुंबईतल्या वरळीच्या रहेजा स्कूल ऑफ आर्टचे ‘कल्पोत्सव’ हे वार्षिक प्रदर्शन दि १ ते ४ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात २०२२-२३ मधील अप्लाइड आर्ट, व्हिजुअल अँड कम्युनिकेशन आर्ट, सीटीसी, फोटोग्राफी आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या विभागातील विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृती रसिकांना पाहण्यासाठी खुल्या असतील.
या प्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या हस्ते दि २८ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट अँड क्राफ्ट्स सोसायटीचे चेअरमन श्याम वाढवानी हे उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.