News

जहांगीरमध्ये राजश्री तावरे

चित्रकार राजश्री तावरे यांचे “मी ” हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि 02 ते 08 मे 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. राजश्री तावरे यांनी आपले कला शिक्षण पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक समूह प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. ‘मी’ या संकल्पनेअंतर्गत राजश्री स्त्रीच्या जीवनाचं चित्रण कॅनव्हासवर चित्रित करतात. या संकल्पनेत चित्रकर्तीच्या अनुभवांचं चित्रणही कॅनव्हासवर पाहायला मिळेल. राजश्री यांची ही चित्रे ऍक्रॅलिक माध्यमात तयार केलेली आहेत. राजश्री यांना मानवी शरीराच्या प्रमाणबद्धतेच पुरेपूर भान असल्यामुळे आकार आणि अवकाश यांचा तोल कॅनव्हासवर सुरेख साधला गेला आहे. आकर्षक मानवी आकार, मोहक रंग आणि चित्राचा तोल हे राजश्री यांच्या चित्रांचं वैशिष्टय आहे.
हे प्रदर्शन सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहील.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.