News

संध्या केळकर यांचे प्रदर्शन

दि ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान चित्रकार संध्या केळकर यांचे ‘रंग मोहिनी’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ आहे. संध्या केळकर या नाशिक येथील एस एम आर के चित्रकला महाविद्यालय येथे चित्रकला विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांची आत्तापर्यंत तीन एकल प्रदर्शने झाली आहेत. निसर्ग आणि त्याचे विभ्रम हा संध्या यांच्या चित्रांचा विषय असला तरी मानवी भावभावनांचे सुंदर चित्रणही त्या आपल्या चित्रातून करतात. या प्रदर्शनातील चित्रे प्रत्यक्ष त्या त्या स्थळांवर जाऊन केलेली आहेत. त्यात राजस्थान, महेश्वर, हम्पी येथील निसर्ग चित्रांचा समावेश आहे. कला रसिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन संध्या केळकर यांनी केले आहे.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.