News

श्रावण गुरव यांचे प्रदर्शन

ज्येष्ठ चित्रकार श्रावण गुरव यांचे चित्र प्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे दि ७ ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. श्रावण गुरव हे जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आहेत. १९५८ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानांतर त्यांनी जाहिरात क्षेत्रात नोकरी केली. त्यांची इलस्ट्रेशन्स लक्षणीय असतात. श्रावण गुरव यांच्या मते निरीक्षण आणि अनुभव यातूनच कल्पकता बहरास येते. प्रस्तुत चित्र प्रदर्शनातील त्यांच्या कलाकृती या क्लासिकल आणि आधुनिक अशा विविध पद्धतीने तयार केल्या आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये तेजस्वी आणि मिश्र रंगांचा वापर केला आहे. दीर्घ निरीक्षण आणि जीवनाविषयी उत्सुकता यामुळे त्यांनी असंख्य चित्रे तयार केली आहेत. या चित्रांचा आस्वाद रसिक ७ ते १३ फेब्रुवारी दरम्यान घेऊ शकतील.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.