NewsUncategorized

रवी वर्मा गॅलरीत शुभा गोखले

चित्रकार शुभा गोखले यांचे ‘गोंदणगाव’ हे चित्र प्रदर्शन पुणे येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत दि 11 ते  16 एप्रिल  2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘गोंदणगाव’ हे शुभा गोखले यांच्या स्टुडिओचंही नाव आहे. कवी ग्रेस यांनी हे नाव त्यांच्या स्टुडिओला दिलं होतं. शुभा गोखले पेंटिंगबरोबर क्राफ्ट वस्तू देखील तयार करतात. यात डायरी, दागिने, पर्सेस यांचा समावेश असतो. या क्राफ्ट वस्तूही रसिकांना या प्रदर्शनात बघता येतील.
या प्रदर्शनाची वेळ सकाळी 11:00 ते  संध्याकाळी  7:00 आहे. अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका बघावी.

Related Posts

1 of 88

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.