News

स्नेहल ओक लिमये यांचे चित्र प्रदर्शन

चित्रकार स्नेहल ओक लिमये यांचे ‘प्रकृती-शक्ती’ चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि २० ते २६ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘प्रकृती – शक्ती’ या चित्रमालिकेत स्नेहल यांनी प्रतीकांचा वापर करून मिथकांना स्वतःच्या दृष्टीकोनातून कॅनव्हासवर चित्रित केले आहे. सध्याच्या वेगवान आयुष्यात प्रकृतीच्या शक्तीकडे अधिक गांभीर्याने बघणे गरजेचे आहे असा संदेश त्यांच्या चित्रातून व्यक्त होतो.
हे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत रसिकांसाठी खुले असेल. कला रसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन स्नेहल ओक लिमये यांनी केले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.