News

स्वाती साबळे यांचे प्रदर्शन

चित्रकार स्वाती साबळे यांचे ‘अंडरटोन्ड कॅनव्हास’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि १७ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्वाती साबळे या जेजे स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्या पत्नी असून त्यांच्या कलाकृतीला २०२१ च्या राज्य कला प्रदर्शनात पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर ललित कला अकादमीच्या २०२२ च्या प्रदर्शनासाठी त्यांच्या कलाकृतीची निवड झाली होती. मागील वर्षी बुसान आर्ट फेअरमध्ये त्यांची चित्रे प्रदर्शित झाली होती. स्वाती साबळे यांच्या चित्रांचे विषय हे प्रामुख्याने स्त्रीमुक्ती , स्त्रियांचे प्रश्न याभोवती केंद्रित असतात.
अधिक माहितीसाठी खालील आमंत्रण पत्रिका पाहावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.