News

डोंबिवलीत उमा कुलकर्णी यांचं प्रदर्शन!

प्रसिद्ध लेखिका आणि चित्रकार उमा कुलकर्णी यांचे ‘आत्मभान -१’ हे चित्र प्रदर्शन दि २१ ते २२ जानेवारी दरम्यान डोंबिवली येथील आनंद बालभवन कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन लोकसत्ताचे निवृत्त संपादक सुधीर जोगळेकर यांच्या हस्ते होणार आहे. डोंबिवली गणपती मंदिराचे ट्रस्टी प्रवीण दुधे, टाटा टेली सर्व्हिसेसचे निवृत्त अधिकारी माधव जोशी आणि कला समीक्षक दीपक घारे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दि २२ जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते आणि उमा कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात लेखक गणेश मनोहर कुलकर्णी आणि ‘चिन्ह’च्या सहाय्यक संपादक कनक वाईकर संवादक म्हणून काम करतील. लेखक आणि कला अभ्यासक गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चिन्ह’ने कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची धुरा सांभाळली आहे. कला रसिकांनी या प्रदर्शन व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक गणेश मनोहर कुलकर्णी यांनी केलं आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.