News

शिल्पा निकम यांचे प्रदर्शन

चित्रकार शिल्पा निकम यांचे ‘ए फोनिक्स ऑफ होप’ हे चित्र प्रदर्शन दि २२ ते २८ नोव्हेंबर दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. दि २२ नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते झाले. शिल्पा निकम या पेंटिंग, ड्रॉईंग, प्रिन्टमेकिंग अशा वेगवेगळ्या माध्यमात काम करतात. या प्रदर्शनातील काही चित्रे ही ऍक्रॅलिक माध्यमात केलेली आहेत. शिल्पा यांच्या बहुतांश चित्रांचं वर्णन हे ‘मूड पेंटिंग’ असं करता येईल. प्रामुख्याने त्यांच्या चित्रांमध्ये टेक्श्चर निर्माण करण्यासाठी असंख्य माध्यमांचा वापर करण्यात आला आहे.

या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत असून अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन शिल्पा निकम यांनी केले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता :
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई – ४०० ००१

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.