News

‘फ्री स्पिरिट ऑफ महात्मा’ प्रदर्शन

दि १९ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ‘फ्री स्पिरिट ऑफ महात्मा’ हे प्रशांत शाह यांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन गांधी फौंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी आणि ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते होणार आहे. दोन ऑक्टोबरला गांधीजींची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या जीवनावर आधारित कलाकृतींचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. प्रशांत शाह यांनी आपल्या कुंचल्यातून गांधीजींच्या आयुष्यावर चित्रे काढली आहेत. यात त्यांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंत घडलेल्या महत्वाच्या घटनांवर आधारित रेखाटने, पेंटिंग्स आणि इंस्टॉलेशन्सचा समावेश आहे.
प्रदर्शनातील कलाकृतींचे एकूण चार भाग करण्यात आले आहेत. पहिला भाग हा चारकोल आणि इंक ड्रॉइंग्सचा आहे. यात गांधीजींच्या आयुष्यातील दुर्दैवी घटना जसे त्यांची हत्या जोरकस रेषांच्या आधारे चित्रीत केली आहे. याबरोबर गांधीजींचे बालपण, इंग्लंडमधील बॅरिस्टरपदाच्या शिक्षणाचे दिवस, भारतात काँग्रेसचे सदस्य म्हणून केलेले कार्य यावर आधारित कलाकृतींचा समावेश आहे.
दुसऱ्या भागात गांधीजींच्या जीवनावर आधारित रंगीत रेखाटनांचा समावेश आहे. दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन, जेल भरो आंदोलन यासारख्या महत्वाच्या आंदोलनामधील गांधीजींची भूमिका आणि सहभाग चित्रित करण्यात आला आहे.
तिसऱ्या भागात ऍक्रॅलिक माध्यमातील १९ पेंटिंग्सचा समावेश आहे. यापैकी १६ गांधीजींची पोर्ट्रेट्स आहेत जे गांधीजींच्या मनाचा कल, त्यांच्या चेहऱ्यवरील भाव यांचे चित्राच्या माध्यमातून प्रगटीकरण करते.
चौथा भाग हा मांडणशिल्पे अर्थात इंस्टॉलेशनचा आहे. यात अमूर्ततेतून मूर्ततेचा अनुभव देणारी इंस्टॉलेशन्स आहेत. गांधीजींची तीन माकडे, गांधीजींचा लेह लडाख प्रवास, बाल सचिनला बघताना गांधीजी हे विषय मांडले आहेत.
आज भारतात खूप बदल घडून आले आहेत पण गांधीजी आजही आपल्या मनावर राज्य करतात. अहिंसा आणि सहिष्णुता हाच या प्रदर्शनाचा संदेश आहे.
हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीच्या हॉल दोनमध्ये आयोजित केले असून प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी सात आहे. अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्रशांत शाह यांनी केले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता:
हॉल २, जहांगीर आर्ट गॅलरी, काला घोडा, मुंबई ४०० ००१

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.