NewsQ&A with Satish NaikShort Videos

‘गच्चीवरील गप्पा ‘ शंभरावा कार्यक्रम ! 

येत्या शनिवारी म्हणजे १० सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी गच्चीवरील गप्पांचा शंभरावा कार्यक्रम होणार आहे . या कार्यक्रमात मूक राहून सतत आपल्या कामात मग्न असणाऱ्या १०० पेक्षादेखील अधिक मराठी चित्रकारांना ज्यांनी कोरोना लॉकडाउनच्या भयग्रस्त वातावरणात बोलतं केलं,  त्या ‘चिन्ह’ च्या संपादकांशी म्हणजे सतीश नाईक यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे .’ गच्चीवरील गप्पा ‘ नंतर काय ? ‘ चिन्ह आर्ट न्यूज इंग्रजीत कधी प्रसिद्ध होणार ? जे जे जगी जगले … कधी प्रसिद्ध होणार ? आगामी चित्र प्रदर्शन कधी ? ‘ चिन्ह ‘ चे अंक नव्या  स्वरूपात कधी वाचायला मिळणार ? अशा असंख्य प्रश्नांची या कार्यक्रमातून मिळतील अशी अपेक्षा आहे.

सतीश नाईक यांना बोलतं करणार आहेत अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा नेहा सावंत.प्रख्यात कवी नारायण सुर्वे यांच्या कृष्णाबाई सुर्वे यांच्या ‘ मास्तरांची सावली ‘ या बहुचर्चित पुस्तकाचं शब्दांकन नेहा सावंत यांनीच केलं आहे .  सतीश नाईक यांचे जे जे स्कूल मध्ये शिकत असल्यापासूनचे मित्र किंवा स्नेही शास्त्रीय संगीत अभ्यासक आणि चित्रकार माधव इमारते हे देखील या कार्यक्रमात प्रश्नकर्ते या नात्यानं सहभागी होणार आहेत . गप्पा’च्या  बहुतांशी कार्यक्रमांच्या निर्मितीत ज्यांचा सहभाग होता त्या गीता कुलकर्णी या देखील या कार्यक्रमात सूत्रसंचालक आणि प्रश्नकर्त्या या नात्यानं सहभागी होणार आहेत .

सतीश नाईक याना  विचारण्यासाठी तुमच्याकडे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते त्यांना लाईव्ह कार्यक्रमात देखील विचारू शकता किंवा ९००४०३४९०३ या क्रमांकावर व्हाट्सअपवर लेखी पाठवून किंवा व्हिडीओ पाठवून देखील विचारू शकता .

गच्चीवरील गप्पा या आमच्या कार्यक्रमाचे आधीचे विडिओ आपण खालील लिंकवर क्लीक करून बघू शकता.

https://www.youtube.com/c/ChinhaMagazine

****

Related Posts

1 of 85

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.