News

गिरीश मिस्त्री यांचं निधन

प्रसिद्ध छायाचित्रकार गिरीश मिस्त्री यांचं दि 22 मे 2023 रोजी हृदय क्रिया बंद पडल्याने दुःखद निधन झालं. गिरीश मिस्त्री यांनी 1990 साली फोटोग्राफीमध्ये  कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते एक अनुभवी छायाचित्रकार आणि प्रशिक्षक होते. ते शारी अकादमी ऑफ प्रोफेशनल फोटोग्राफी आणि डिजिटल इमेजिंगचे संस्थापक आणि प्रमुख होते .

गिरीश मिस्त्री यांची छायाचित्रकार म्हणून कारकीर्द जवळपास चार दशकांची आहे. त्यांनी अमेरिकेतून कला आणि विज्ञानाचे शिक्षण घेतले. फॅशन आणि जाहिरात क्षेत्रात फ्रंट प्रोजेक्शन तंत्रज्ञान यशस्वीपणे सादर करणारे ते पहिले भारतीय छायाचित्रकार होते. त्यांनी Sony India, Zeiss, Epson, Manfrotto आणि Gitzo साठी प्लॅटिनम भागीदार, मार्गदर्शक म्हणून काम केलं. त्याचबरोबर त्यांनी टाइम्स जर्नल ऑफ फोटोग्राफीचे माजी अतिथी संपादक म्हणून देखील काम केलं. त्यांनी कोडॅक इंडिया, कॅनन, प्रादेशिक फोटोग्राफी असोसिएशन या संस्थांसाठी संपूर्ण भारतामध्ये अनेक कार्यशाळा घेतल्या. ते भारतातील प्रमुख कला महाविद्यालयांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. गिरीश मिस्त्री यांनी अनेक नामवंत छायाचित्रकारांना प्रशिक्षण दिले. त्यापैकी विक्रम बावा, जिग्नेश झवेरी, हिमांशू सेठ, मुदिता एरोन, ध्रुविन शाह, विवेक सिक्वेरीरा, रंजन झिंगाडे, विनीत भट, रिद्धी पाररेख, भरत भिरंगी, सचिन चांदणे, वरुण चावला ही काही मोठी नावे आहेत.

गिरीश मिस्त्री यांची अनेक प्रदर्शने भारत आणि जगभरात आयोजित झाली आहेत. त्यामध्ये एआयपीए ऑफ इंडिया – वेस्टने आयोजित केलेल्या सदस्यांच्या प्रदर्शनात त्यांनी सलग चार वेळा भाग घेतला. 1990 मध्ये , जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे प्रथमच फोटो सरिअलिझम या प्रकारात फोटोंचे प्रदर्शन केले. 1991मध्ये पिरामल आर्ट गॅलरी, N.C.P.A., मुंबई येथे प्रायोगिक छायाचित्रणाचे एक प्रदर्शन (फोटोसरीयलिझम) केले. 1993 मध्ये मॅक्स म्युलर भवन फोटो गॅलरी, नवी दिल्ली येथे “क्रिएटिव्ह फोटोग्राफीचे पैलू”, प्रदर्शन हे त्यांचे प्रदर्शन गाजले होते. 1995 मध्ये हॉलंड येथील आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनासाठी भारतातून फक्त दोन स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले होते.

गिरीश मिस्त्री यांना अनेक मानसन्मान देखील मिळाले. त्यामध्ये खालील पुरस्कारांचा समावेश आहे.
1991: पांचाल सेवा समाज, मुंबई तर्फे सन्मान पत्र.

1995: पालक मंत्री चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सन्मान पत्र. छ. संभाजीनगर फोटोग्राफर्स असोसिएशन

ऑरेंज सिटी फोटोग्राफर असोसिएशनतर्फे सन्मान पत्र. नागपूर.

1997: कला गुर्जरी, मुंबई द्वारे विषेश, सन्मान पत्र.

1998: जगदलपूर फोटोग्राफर असोसिएशन, रायपूर, मध्य प्रदेश द्वारे अविषेश, सन्मान पत्र

2003: श्री छगन भुजबळ आणि श्री अनिल देशमुख, एआयपीटीआयए आणि पॅन इंडिया नेटवर्क यांच्या हस्ते फोटोग्राफीच्या कलेसाठी अमूल्य योगदानाबद्दल कौतुक

2010: महाराष्ट्रातील महा लोक म्हणून ओळखले गेले. IMB, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त.

2012: अल्मा मॅटरच्या सेंट झेवियर्स बॉईज अकादमीचे ‘हॉल ऑफ फेम’.

छायाचित्रकार म्हणून दीर्घ कारकीर्द लाभलेल्या गिरीश मिस्त्री यांना चिन्ह परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.