News

कलादीप मार्फत किती कार्यक्रम झाले ?

यावर्षी कलादीप या जेजेच्या विद्यार्थी समितीमार्फत विविध मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात येतील असे जाहीर करण्यात आले होते. कलादीपच्या चेअरपर्सन स्मिता किंकळे यांनी असे जाहीरही केले होते. प्रत्यक्ष मात्र एकाच मुलाखतीचे आयोजन झाले. चित्रकार राजू पाटील यांची मुलाखत घेण्यात आली. डीन विश्वनाथ साबळे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पण तो कार्यक्रम झालाच नाही. खरं तर या मुलाखतीचे रीतसर आयोजन करण्यात आले असते, त्यांचे डॉक्युमेंटेशन झाले असते तर कला विद्यार्थ्यांसाठी हा खूप उपयुक्त उपक्रम ठरला असता. पण एवढा गाजावाजा करून जो उपक्रम आयोजित करण्यात आला त्याचा फक्त एकच कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आता शैक्षणिक वर्ष जवळपास संपले आहे असे असताना जर एकाच कार्यक्रम आयोजित झाला असेल तर इतर मुलाखतींचे आयोजन कधी होणार असा प्रश्न कलावर्तुळातून विचारण्यात येत आहे.

या उपक्रमाचे आयोजन गांभीर्याने करण्यात आले होते का केवळ आपण काहीतरी भव्यदिव्य करत आहोत हे भासवण्यासाठी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.