News

इंस्टाग्रामवरून करिअर घडवणारी कलाकार !

अनेक चित्रकार सोशल मीडियावर आपले अस्तित्व तयार करण्यास उत्सुक नसतात. पण हॉलंडच्या एका चित्रकर्तीने इंस्टाग्रामचा योग्य वापर करून आपले करिअर घडवले आहे. आर्ट न्यूजमध्ये तिची माहिती आली होती त्यानुसार तिचे इंस्टाग्रामवर तब्बल १ लाख फॉलोवर्स आहेत. आपले काम ती सातत्याने इंस्टाग्रामवर टाकते. आणि हळू हळू इंस्टाग्रामवर तिने स्वतःचे खास अस्तित्व तयार केले आहे. आज ती प्रथितयश अशा सॅन फ्रान्सिस्कोमधील जेसिका सिल्व्हरमॅन गॅलरीमध्ये आपले चित्र प्रदर्शन करत आहे. आपल्या वाचकांसाठी ही घटना महत्वाची वाटली म्हणून ‘चिन्ह’चे वाचक विशेषत: तरुण चित्रकार वाचकांसाठी ही विशेष बातमी देत आहोत.

खरं तर रूढ अर्थाने रेकडे कला क्षेत्रातील कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमीही नाही. पण सोशल मीडिया आणि आपले काम याचा सुरेख मेळ साधून ती यशाच्या पायऱ्या चढत आहे. इंस्टाग्रामच्या फोटो केंद्रित जगात, जिथे रोज ग्राहकांना आकर्षित करणारे लाखो फोटोज अपलोड केले जातात तिथे क्लेनचे काम उठून दिसते आहे. तिच्या पेंटिंग्जमध्ये आकार हे आपले वेगळे अर्थ घेऊन येतात. त्यामध्ये शंख, महासागर, रिकाम्या जागेत तरंगणाऱ्या मेणबत्या, दोन डोके असलेले पक्षी, तळहातातून चमकणारे रत्न असे आकार सातत्याने दिसतात. निळा, लाल, करड्या रंगाच्या पार्श्वभूमीवर केलेली मानवी चेहऱ्याचे चित्रण विशेषतः स्त्रियांचे चित्रण काहीसे गूढ भासते. बघणारे लोक मात्र तिच्या चित्रात गुंतून पडतात असे दिसते.

कम्फर्ट इन कॅलॅमिटी या प्रदर्शनातील रे ची चित्रे

इंस्टाग्रामवर रे ने आपली चित्र १०० डॉलर्सला विकण्यास सुरुवात केली होती. कोरोना काळात तिचे फॅन फॉलोवर्स प्रचंड वाढले आणि तिला अजूनच लोकप्रियता मिळाली. आज ती इंस्टाग्रामवर चित्रे विकत नाही. मोठ्या गॅलऱ्यांशी तिचे व्यावसायिक संबंध आहेत. सामान्य घरातून येऊन तिने मिळवलेले हे मोठे यश आहे. तिचे काम चांगले की वाईट हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण कलेची पार्श्वभूमी नसताना ती आज यशस्वी आहे ते सोशल मीडियाचा योग्य वापर करून. तिने स्वतःचे मार्केटिंग केले, कलाकृती कशी पाठवायची आणि खरेदीदारांशी व्यवहार कसा करायचा या गोष्टी शिकली. आता ती पूर्णवेळ व्यावसायिक चित्रकार आहे.

रे क्लेनचे उदाहरण महत्वाचे यासाठी आहे कारण नवोदित चित्रकार यातून बऱ्याच गोष्टी शिकू शकतात. सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपले यशस्वी करिअर घडवणे शक्य आहे गरज आहे ती फक्त कामातल्या आणि स्वतःला नव्या माध्यमांवर सादर करण्याच्या सातत्याची.

रे क्लेनच्या इंस्टाग्राम प्रोफाईलची लिंक:
https://www.instagram.com/rae_klein/

जेसिका सिल्वरमन गॅलरीतले रेचे प्रदर्शन :
https://jessicasilvermangallery.com/online-shows/rae-klein-the-comfort-in-calamity/

****

(रे क्लेनचा फोटो आर्ट न्यूज वेबसाइटवरून साभार)

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.