News

दिवाळी अंकातील महत्वाचे लेख

शब्दरुची आणि ऋतुरंग या दोन दिवाळी अंकात कला समीक्षक शर्मिला फडके यांचे दोन महत्वाचे लेख समाविष्ट आहेत.
देवदत्त आणि दत्तात्रय पाडेकर हे चित्रकलेच्या क्षेत्रातील प्रतिथयश नाव. शब्दरुची या दिवाळी अंकाची यंदाची संकल्पना ‘वारसा’ ही आहे. या संकल्पनेला अनुसरून चित्रकलेतील वारसा या संदर्भात पाडेकर पितापुत्रांची मुलाखत शर्मिला फडके यांनी शब्दरूची दिवाळी अंकासाठी घेतली आहे.
शब्दरुची दिवाळी अंक
मूल्य : 300
ग्रंथाली प्रकाशन
अंक मागावण्यासाठी संपर्क :
92234 66860 / 90049 49656

गुलझार यांच्या कवितांवर मिंजल मखिजा या बंगलोरच्या तरुण चित्रकर्तीने काढलेल्या देखण्या चित्रांचं प्रदर्शन गेल्या वर्षी सिमरोझा आर्ट गॅलरीत आयोजित केले होते. कोव्हीड काळामुळे हे प्रदर्शन फार लोकांपर्यंत पोचू शकलं नाही. मिंजल यांनी ही चित्रे उस्फूर्तपणे काढली, गुलझारजींच्या सोबत त्यासंदर्भात वारंवार संवाद साधला. ही सगळी प्रोसेस काय होती, गुलझारांची कविता ही मुळातच इतकी चित्रमय असताना अशी चित्र काढण्यामागची मिंजलची मानसिक धारणा काय होती हे तिने ऋतुरंग दिवाळी अंकाकरता मोकळेपणाने सांगितले. मिंजल मखिजा यांच्या या मनोगताचे शब्दांकन शर्मिला फडके यांनी ऋतुरंग दिवाळी अंकात केले आहे.
ऋतुरंग दिवाळी अंक
पृष्ठसंख्या 300। मूल्य : 300
ऋतुरंग प्रकाशन
अंक मागवण्यासाठी संपर्क – 8104446943

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.